महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली बिगर राजकीय असलेली सामाजिक संस्था आहे.महाराष्ट्र शासन सोसायटी नियम १८६० व चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत.
विद्यार्थी संघटनांच्या व कृषि उद्योगासमोर असलेल्या तत्कालीन ज्वलंत प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म झाला असून,कृषि पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात.संघटनेच्या सभासद, शेतकरी, बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे शासन दरबारी ते मांडणे कृषि व पूरक क्षेत्रात सामाजिक व बहुउद्देशीय उपक्रम राबवणे व या बरोबरच शेतकरी बांधवाना कृषि व समस्त पदवीधरांच्या माध्यमातून कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे, उद्योजकतेचा विकास करणे, तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या धोरणात्मक प्रश्नात सहभाग घेणे आणि एकूणच कृषि व बहुउद्देशीय क्षेत्रात नवनवीन व पूरक उपक्रम, विविध प्रशिक्षणे राबवणे सभासदांचा व कृषि क्षेत्राचा विकास साधणे हि विचारधारा संस्थे द्वारे अनेक दशके कार्यरत आहे.
संस्थेचे विविध विभाग हे गेल्या काही वर्षात निर्माण झालेले आहेत. उद्योजकता विकास प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे, रोजगार मेळावे, कृषि यात्रा व प्रशिक्षणे अशा विषयांना वाहिलेले आहेत. शेतकऱ्यांचे विविध गट, मंडळे गेल्या अनेक वर्षात राज्यभर संस्थेने स्थापन केली आहेत. आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौऱ्यां करता शेतकऱ्यांचा आणि उद्योजकांचा विश्वास संस्थेने सार्थ केलेला आहे. कृषि पदवीधर संघटना कृषि व संलग्न विषयांतील सर्व पदवीधर,पदविकाधारक, शेतकरी बांधवांकरिता जाती भेद विरहित लिंग व धर्म विरहित संस्था आहे.
हि संघटना राज्यातील कृषि व संलग्न पदवीधरांची सर्वोच्च शिखर संस्था बनलेली असून, महाराष्ट्र राज्यात कृषि, प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासात देखील हि आता अग्रेसर व पथदर्शी संस्था आहे. काळाच्या ओघात संस्थेच्या विविध विभागांच्या सेवा अल्पावधीत शेतकरी व पदवीधर आणि उद्योग जगतात लोकप्रिय ठरल्या आहेत.

उद्योगभारती हा कृषि व पदवीधर संघटना द्वारा पुरस्कृत प्रशिक्षण विभाग असून कृषि व उद्योजकता प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि व उद्योजकता अभ्यास दौरे व कॉर्पोरेट उद्योगांना प्रशिक्षण व्यावसायिक सेवा यात प्रामुख्याने कार्यरत आहे. हा विभाग विविध कृषि व उद्योजकता प्रशिक्षणे राबवणे, विविध उद्योगांना ब्रॅण्डिंग सेवा, पुरस्कार सोहळ्यातील व्यासपीठ व प्रॉडक्ट लॉन्चिंग, उद्योजकीय विषयांवरील क्षमता विकास शिबिरे, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रम, इ. विभागात कार्यरत आहे.प्रदर्शने, प्रशिक्षणे, प्रबोधन या त्रिसूत्रीतून स्थानिक पातळीवर युवक, बेरोजगार, विद्यार्थी, शेतकरी यांना तसेच उद्योजकांना कृषि व संलग्न क्षेत्रात तांत्रिक मार्गदर्शक मित्र म्हणून हा विभाग काम करीत आहे.
कृषि व संलग्न उद्योग प्रकल्पांना लघुउद्योजकांना प्रकल्प अहवाल बनवून देणे व प्रकल्प मार्गी लागण्याकरिता बँकां मार्फत आर्थिक साहाय्य मिळवून देणे तसेच उद्योजकांना खाजगी तत्वावर सल्ला व सेवा प्रदान करणे या सेवांसह विविध कृषी अथवा बिगर कृषी उद्योग पूरक विषयांवर एक दिवसीय कार्यशाळा तसेच दुग्ध व्यवसाय,शेळी पालन,ग्रीन हाऊस,पोल्ट्री, मधुमक्षिका पालन, कृषि उद्योजकता कार्यशाळा, बिगर कृषी प्रशिक्षणे सातत्याने या विभागात आयोजित केली जातात. विविध कॉर्पोरेट उद्योगांना गरजे नुसार प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय कृषि अभ्यास दौरे यांची सेवा उद्योगभारती तर्फे देण्यात येते. आम्ही राबवत असलेल्या सी एस आर प्रकल्पात या विभागाचा मोठा वाटा आहे.