युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा. २०२६ -२७.
कृषि पदवीधर संघटना आयोजित
कृषि पदवीधर संघटना दर वर्षी राज्यस्तरीय "युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा" आयोजित करीत आहे, गेले दोन दशकां पासून हा पुरस्कार सोहळा पार पडला जातो. पुढील प्रमाणे विविध विभागात दरवर्षी या पुरस्कार साठी इच्छुक व्यक्ती व कंपन्या यांच्या कडून प्रस्ताव नामांकने व स्पॉन्सर शिप स्वीकारले जातात.
- प्रगतिशील शेतकरी पिके - फळपिके, द्राक्ष ,डाळिंब, ऊस इ.
- कृषि व संलग्न उद्योग व्यवसाय. (ऍग्रीबिझनेस)
- पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन.
- पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय इ.
- महिला सक्षमीकरण/ महिला उद्योजिका.
- कला व क्रीडा लेखन साहित्य इ.
- कायदा
- कृषि अथवा इतर सामाजिक पत्रकारिता
- शिक्षण संशोधन कार्य व सेवा / महाविद्यालये.
- अकृषक व्यवसाय व स्टार्ट अप, सोशल मिडिया व इंडस्ट्रीज.
- नवोदित स्टार्ट अप व कौशल्य विकासासाठी योगदान.
- कोणतीही विशेष सामाजिक अथवा वैयक्तिक सेवा.
- ऑन लाईन व ऑफ लाईन असे दोन्ही प्रकारे प्रस्ताव स्वीकारले जातात.
- ऑन लाईन प्रस्तावाची प्रत agrigraduatesassociation@gmail.com वर पाठवावी.
(स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपात) - ऑफ लाईन प्रस्ताव "प्रति - श्री भाऊसाहेब कडूस पाटील ( महासचिव , कृ . प . सं .), कृषि पदवीधर संघटना विभागीय कार्यालय, फ्लॅट ७, लेन ३, कर्नाटक बँकेजवळ, डी मार्ट मागे, बाणेर पुणे ४५ ". या पत्त्यावर पाठवावा.
- प्रत्येक वर्षी प्रस्ताव करणारे व्यक्ती यांच्या कडून प्रस्ताव सह देणगी शुल्क स्वीकारले जाते. सादर देणगी शुल्क हे संस्थेच्या अधिकृत खात्यावरच स्वीकारले जाते. या देणगी शुल्कातून प्रत्येक वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक दृष्ट्या आवश्यक घटकांना जाहीर मदत केली जाते.
वर नमूद १२ क्षेत्रात आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, महिलांच्या, विद्यार्थी अथवा समाजसेवकांच्या कार्य करणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व जाहीर कार्यक्रमात सन्मानित करण्यात येते. यामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. सहभागी होण्याकरता दरवर्षी agrigraduatesassociation@gmail.com या वर वर्षभर प्रस्ताव स्वीकारला जातो. या करता शुल्क आकारले जाते. किंवा किमान संस्थेचे आजीवन सभासद शुल्क भरलेले असावे यातील एक अट पूर्ण केलेली असावी. आजच संपर्क साधा.
या कार्यक्रमाचे व्यासपीठ हे राज्यपातळीवरील असल्याने, राज्यातील कृषि मंत्री, सचिव , अथवा विविध विभागांचे आयुक्त आणि राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी या सोहळ्यास उपस्थित असतात. अनेक खत उत्पादक कंपन्यांना किंवा लघु उद्योगांना ब्रॅण्डिंग करण्यासाठी ची हि सुवर्णसंधी असते. याच बरोबर प्रयोजकांना व्यासपीठावरील मान्यवरांसह संवाद साधण्याची संधी या निमित्ताने मिळते. या सर्व सोहळ्याचे प्रयोजकांची जाहिरात आणि त्यांच्या वयवसायाचे ब्रॅण्डिंग साधारण तीन महिने आधी पासून केले जाते. प्लॅटिनम, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा चार विभागासह मिडिया आणि हॉस्पिटॅलिटी पार्टनर्स सुद्धा आम्ही आमंत्रित करतो. अधिक माहिती साठी खालील पीडीएफ डाउनलोड करावी.
