करिअरभारती विभागा कडून या वर्षी च्या एबीएम प्रवेशाची नोंदणी

१६ मार्च ते १६ जून

संस्थेची प्रकाशने व पुस्तके मिळवण्यासाठी.


  • कोरोना आपातकालीन मदत निधि

संस्थेविषयी

कृषि व पदवीधर संघटना हि महाराष्ट्रातील राज्य पातळीवरील कृषि व संलग्न पदवीधरांनी, पदविकाधारकांनी स्थापन केलेली राज्यातील सर्वात पहिली व बिगर राजकीय आणि पदवीधर व शेतकरी यांचा हक्कां वर आधारित असलेली कृषि व बहुउद्देशीय सामाजिक संस्था आहे. महाराष्ट्र शासन सोसायटी नियम , चॅरिटेबल ट्रस्ट कायदा १८६० व १९५० या नुसार संचालक मंडळ व संस्थेतील सदस्य पदाधिकारी कार्यरत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या २०१० च्या दशकातील तत्कालीन ज्वलंत शैक्षणिक प्रश्नांच्या माध्यमातून या संस्थेचा जन्म झाला असून, कृषि - पदवीधर संघटनेतील देणगीदार सदस्य हे पूर्ण वेळ तसेच स्वयंसेवक पदाधिकारी म्हणून कार्यरत असतात. अशाप्रकारची राज्यातील कृषि पदवी धारका कडून व्यवस्थापन होत असलेली हि राज्यातील पहिली व एकमेव व राज्यातील चार हि कृषि विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या कृषि व संलग्न पदवीधर आणि पदविकाधारक आणि अंतिमतः शेतकरी यांचा समन्वय साधणारी हि संस्था आहे

या संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे:
  • संस्थेच्या सदस्यांसमोर पदवीधर बांधवांसमोर उभे राहणारे शैक्षणिक, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकीय प्रश्न सोडवणे.

  • कृषि आणि उद्योगात तांत्रिक मार्गदर्शन करणे व मनुष्य बळ व लाभार्थ्यांना प्रशिक्षित करणे, विविध कृषि व संलग्न प्रशिक्षण वर्ग, शिबिरे, प्रदर्शने व अभ्यास दौरे आयोजित करणे.

  • शेतकऱ्यांच्या आणि कृषि व संलग्न पदवीधर यांच्या शिक्षण रोजगार तसेच शेती क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्नात संघटनेच्या माध्यमातून सहभाग घेणे व शासनास त्याचा पाठ पुरावा करणे.

  • कृषि व सामाजिक तसेच विज्ञान आणि सल्ला सेवा क्षेत्रात नवनवीन कृषि व बिगर कृषि पण समाज उपयोगी उपक्रम राबवणे.

  • कृषी व विज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, उद्योग, संशोधन व सल्ला सेवा विकसित करणे.

  • इतर बहुउद्धेशीय कार्ये उदा. क्रीडा, कायदा, महिला सक्षमीकरण, पत्रकारिता, पर्यावरण, दूरस्थ शिक्षण.

संस्थापकांचा संदेश

Mr-Mahesh-Kadus

अ‍ॅड. महेश कडूस पाटील

संस्थापक आणि अध्यक्ष.

कृषि व पदवीधर संघटना आणि त्याचे विविध विभाग हे कृषि आणि उद्योजकता तसेच इतर क्षेत्रात पदवीधरांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आमूलाग्र बदल घडवून आणणारी राज्यातील कृषि व संलग्न पदवीधर आणि पदविकाधारकांची सर्वोच्च संघटना आणि संस्था आहे.

हि एक प्रकारची चळवळच आहे, त्याचे विविध विभाग यांच्या माध्यमातून कृषि आणि पूरक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करणे आणि उद्योजकतेचा व स्वयंरोजगाराचा विकास करणे हे संस्थेतील सर्व घटकांचे ध्येय आहे. पदवीधर विद्यार्थ्यां करता रोजगार, ऍग्रीकल्चर कोर्पोरेट्स करता विविध सल्ला आणि सेवा देण्यात आम्ही अग्रेसर आहोत याचा आम्हाला अभिमान आहे.

इस्राईल आणि एकूणच जगातील शेती तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या शिवारात आणि उद्योजकाच्या हातात पोहोचले पाहिजे या करता आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्यक्रम महाराष्ट्रात आम्ही राबवित आहेत, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थीना लाभ मिळवून देणे हे कार्य गेल्या अनेक वर्षात संस्थेने उत्तमरीत्या सभासदांच्या व लाभार्थ्यांच्या पाठ बळावर पार पडले आहे.

कृषि व संलग्न क्षेत्राचा आणि उद्योजकतेचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने या पुढे हि आमचे स्वयंसेवक आणि कर्मचारी कार्यरत राहतील. राज्यातील कृषि व संलग्न पदवीधरांना एका व्यासपीठावर आणणे आणि कृषि व सामाजिक क्षेत्रात योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.

आगामी कार्यक्रम २०२६

७ जून २०२६ - २७

युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा २०२६-२७.

कृषि पदवीधर संघटना दर वर्षी राज्यस्तरीय "युवाप्रताप कृषि व सामाजिक पुरस्कार सोहळा" आयोजित करीत आहे, गेले दोन दशकां पासून हा पुरस्कार सोहळा पार पडला जातो. पुढील प्रमाणे विविध विभागात दरवर्षी या पुरस्कार साठी इच्छुक व्यक्ती व कंपन्या यांच्या कडून प्रस्ताव नामांकने व स्पॉन्सर शिप स्वीकारले जातात.

१. प्रगतिशील शेतकरी पिके - फळपिके, द्राक्ष, डाळिंब, ऊस इ.
२. कृषि व संलग्न उद्योग व्यवसाय. (ऍग्रीबिझनेस)
३. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन.
४. पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय इ.
५. महिला सक्षमीकरण/ महिला उद्योजिका.
६. कला व क्रीडा लेखन साहित्य इ.
७. कायदा
८. कृषि अथवा इतर सामाजिक पत्रकारिता
९. शिक्षण संशोधन कार्य व सेवा / महाविद्यालये.
१०. अकृषक व्यवसाय व स्टार्ट अप, सोशल मिडिया व इंडस्ट्रीज.
११. नवोदित स्टार्ट अप व कौशल्य विकासासाठी योगदान.
१२. कोणतीही विशेष सामाजिक अथवा वैयक्तिक सेवा.

वर नमूद १२ क्षेत्रात आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, महिलांच्या, विद्यार्थी अथवा समाजसेवकांच्या कार्य करणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह व जाहीर कार्यक्रमात सन्मानित करण्यात येते. यामध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता. सहभागी होण्याकरता दरवर्षी अग्रिग्रदूत्त्येसासूसलेशन या वर वर्षभर प्रस्ताव स्वीकारला जातो. या करता शुल्क आकारले जाते. किंवा किमान संस्थेचे आजीवन सभासद शुल्क भरलेले असावे यातील एक अट पूर्ण केलेली असावी. आजच संपर्क साधा.

नोंदणी करा
मे २०२७ - ऑक्टोबर २०२७

ईस्राईल सह जॉर्डन इजिप्त कृषि अभ्यास दौरा

दरवर्षी संघटने च्या उद्योगभारती या विभाग मार्फत दिनांक ५ मे ते ११ मे या कालावधीत दर वर्षी ईस्राईल सह जॉर्डन व पॅलेस्टाईन या तिन्ही देशांचा कृषि अभ्यास दौरा आयोजित केला जातो. तसेच वर्षातील दुसरा दौरा दिनांक ५ ते ११ ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ या कालावधी मध्ये देखील ईस्राईल सह इजिप्त कृषि अभ्यास दौरा आयोजित ऑफ सिझन दौरा म्हणून आयोजन होते. या दोन्ही गट करता राज्यातील किंवा राज्याबाहेरील शेतकरीगट, उद्योजक, विद्यार्थी, ऍग्रोकॉर्पोरेट्स, ऍग्रोडीलर्स टूर्स यांची नोंदणी वर्षभर सुरु असते. मे च्या दौऱ्या करिता दर वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च हीच प्रवेशाची अंतिम दिनांक असते. ३१ मार्च नंतर मे महिन्याच्या दौऱ्या करता प्रवेश स्वीकारले जात नाहीत. त्या नंतर ऑफ सिझन असलेल्या ऑक्टोबर दौऱ्या करिता दिनांक १ जून ते १५ ऑगस्ट दर वर्षी प्रवेशाची अंतिम मुदत असते. कृषि तंत्रज्ञान व कृषि पर्यटनाचा अभूतपूर्व अनुभव म्हणजे उद्योगभारती या विभागाकडून आयोजित असलेला हा इस्राईल कृषि अभ्यास दौरा. महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी, ऍग्रोकोर्पोरेट्स आणि शेतकरीबांधव, कृषिउद्योजक महिलाभगिनी यात सहभागी होऊ शकतात. ऍग्रो कंपन्या आपले स्वतंत्र डीलर ग्रुप देखील आम्हाला देऊ शकतात. दौऱ्यासाठी प्रथम येणाऱ्यास व पासपोर्ट असणाऱ्यास प्राधान्य असते. साधारण दोन दशकां पासून संस्थेची हि सेवा महाराष्ट्र सह इतर राज्यातील सुद्धा प्रगतिशील शेतकर्यां साठी सुरु आहे. यास कोणतेही शासकीय अनुदान नाही. हा संपूर्ण खाजगी दौरा आहे.

नोंदणी करा

प्रशंसापत्र